Posts

एक अत्यंत दुर्मिळ असलेला, असा एक ग्रंथ आहे, जो आमच्या सनातन धर्म वाङमयात आहे. खरं तर याला सात आश्चर्यां मधील प्रथम आश्चर्याचा सन्मान दिला पाहिजे --- हा आहे दक्षिण भारतातील एक अनमोल असा ग्रंथ काय हे शक्य होऊ शकतं ?? की... या ग्रंथाचे सरळ वाचन केले तर राम कथा रुपात तो वाचल्या जातो, आणि त्याच ग्रंथातील लिहिलेल्या शब्दाचे उलट वाचन करीत वाचले तर... कृष्ण कथा साकार होत जाते. हो, हे एकदम सत्य आहे, कांचीपुरम येथील १७ व्या शतकातील कवि वेंकटाध्वरि रचित ग्रंथ "राघवयादवीयम्"  हा असाच एकमेव अद्भुत ग्रंथ आहे. या ग्रंथास ... ' अनुलोम - विलोम काव्य ' देखील म्हटले जाते. या संपूर्ण ग्रंथात फक्त ३० श्लोक आहेत. या श्लोकांचे सरळ सरळ वाचन करतांना रामकथा साकारली जाते. आणि विपरीत (उलट्या) क्रमाने वाचल्यावर कृष्ण कथा. अशा प्रकारे हे तर केवळ ३० च श्लोक आहे. परंतु कृष्ण कथा (उलटे म्हणजे विलोम) चे पण ३० श्लोक जोडले तर ते होतात ६० श्लोक. ग्रंथाच्या नांवा वरुन देखील हेच प्रदर्शित होते. राघव (राम) + यादव (कृष्ण) यांचे चरित्र दर्शविणारी गाथा आहे ~ "राघवयादवीयम।" उदाहरण